Ad will apear here
Next
स्वयंपूर्ण खेड्यातूनच बनेल आत्मनिर्भर भारत : अविनाश धर्माधिकारी (व्हिडिओ)


पुणे :
‘भारताकडे सर्व प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. संशोधनाची जोड देऊन त्याचा स्थानिक पातळीवर कुशलतेने वापर केल्यास खेडी स्वयंपूर्ण बनतील. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठेत ब्रँड मिळवून दिला आणि खेडी स्वयंपूर्ण झाली, तर आगामी काळात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल,’ असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.  

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सीए दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावरील व्याख्यानात (लाइव्ह वेबिनार) अविनाश धर्माधिकारी बोलत होते. या व्याख्यानावेळी ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष समीर लड्डा, सचिव-खजिनदार सीए काशिनाथ पाठारे, सीए जगदीश धोंगडे, सीए एस. बी. झावरे, सीए यशवंत कासार आदी उपस्थित होते.



अविनाश धर्माधिकारी म्हणाले, ‘जागतिक स्तरावर भारतीय बाजारपेठ सर्वांत मोठी असून, ही आपली ताकद आहे. मागणी-पुरवठा याचा मेळ घालून स्थानिक उत्पादनांना प्राधान्य दिले, तर आपली अर्थव्यवस्था जलदगतीने सुधारेल. त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना मांडली. करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेले आर्थिक पॅकेज या संकल्पनेला बळ देणारे आहे. १३५ कोटीच्या बाजारपेठेत एकाच प्रकारचा जीएसटी आकारला तर स्वातंत्र्योत्तर वाटचालीतील मोठी क्रांती होईल. विदेशी विशेषतः चिनी वस्तू आणि सेवांचा वापर टाळण्यासह अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, लोकसंख्या आणि मागणी यावर अधिक विचार करण्याचा मंत्र मोदी यांनी दिला आहे. ‘ट्रेड फॅसिलिटेशन अॅग्रीमेंट’ झाले तर भारताला जागतिक व्यापारात ३०० बिलियन डॉलर्सचा वाटा मिळेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.’

‘खासगी क्षेत्राला सर्व सरकारी क्षेत्रे खुली करण्याचे धोरण अवलंबले जात आहे. मागणी-पुरवठा यावर आधारित बाजारपेठ चालेल. सरकार केवळ बाजारपेठ व्यवस्थित चालण्यासाठी नियमन करण्याच्या भूमिकेत असेल आणि ही अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची बाब असणार आहे. तेव्हा भारतीय उद्योजकांनी बाजारपेठेची मागणी ओळखून वाटचाल करावी,’ असेही धर्माधिकारी यांनी नमूद केले. सीए अभिषेक धामणे यांनी प्रास्ताविकात सीए दिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. सीए जगदीश धोंगडे यांनी स्वागत केले आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सीए समीर लड्डा यांनी आभार मानले.

(व्याख्यानाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XYTKCO
Similar Posts
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
बालदिनी विशेष मुलांसाठी काँग्रेसतर्फे खास कार्यक्रम पुणे : पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती अर्थात बालदिनानिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटीने कामायनी संस्थेतील मूकबधिर व मतिमंद मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. जंगली महाराज रोडवरील मॅकडोनाल्ड येथे १४ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. टॅटू पेंटिंगसह अन्य वेगवेगळ्या गमतीजमतींचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language